पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST2017-10-30T00:25:59+5:302017-10-30T00:28:12+5:30

अकोला : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य  संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली  आहेत. याच परंपरेत यावर्षी विदर्भ साहित्य संघाचे पाचवे  बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी  होणार आहे. 

Fifth Bal-Kumar Sahitya Sammelan at Akola | पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोल्यात

पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोल्यात

ठळक मुद्देशंकर कर्‍हाडे संमेलनाध्यक्षपदी १ व २ डिसेंबरला होणार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य  संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली  आहेत. याच परंपरेत यावर्षी विदर्भ साहित्य संघाचे पाचवे  बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी  होणार आहे. 
विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा संमेलनाची निमंत्रक  असून प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे. सु प्रसिद्ध कवी व बाल साहित्यिक शंकर कर्‍हाडे यांची  संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विदर्भ साहित्य  संघाच्या घटनेनुसार संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आयोजक  संस्थेला तीन नावांची शिफारस केली जाते. त्यातून अकोला ये थील आयोजक संस्थेने शंकर कर्‍हाडे यांच्या नावाला मान्यता  दिली असून, त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले आहे.
 विदर्भ साहित्य संघाच्या रविवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या  सभेत या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली. अखिल  भारतीय बाल-कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व प्रसिद्ध  कवयित्री तसेच बाल साहित्य लेखिका डॉ. संगीता बर्वे यांचे हस् ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. 

Web Title: Fifth Bal-Kumar Sahitya Sammelan at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.