अकोट नगरपालिकेच्या शाळांना जोडून सुरू करणार पाचवा व आठवा वर्ग
By Admin | Updated: May 3, 2017 19:34 IST2017-05-03T19:34:05+5:302017-05-03T19:34:05+5:30
अकोट : येत्या शैक्षणिक सत्रात नगर परिषद प्राथमिक शाळांंना जोडून पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

अकोट नगरपालिकेच्या शाळांना जोडून सुरू करणार पाचवा व आठवा वर्ग
अकोट : येत्या शैक्षणिक सत्रात नगर परिषद प्राथमिक शाळांंना जोडून पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
बालकांच्या शिक्षण अधिकार अधिनियमात प्राथमिक शिक्षणाची संरचना इयत्ता १ ते ५ वर्ग, कनिष्ठ प्राथमिक ६ ते ८ वर्ग वरिष्ठ प्राथमिक विभागात समाविष्ट करण्यात आले. या संरचनेनुसार नगर परिषद शाळांमध्ये पाचवा व आठवा वर्ग सुरू करण्याची मागणी विचारात घेऊन येत्या शैक्षणिक सत्रात न.प. मराठी शाळा क्र. ६, उर्दू शाळा क्र. २ व ३ येथे पाचव्या वर्गाची सोय उपलब्ध झाली आहे.
न. प. मराठी शाळा क्र. १ व ७ आणि उर्दू शाळा क्र. १ व ५ येथे आठवा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या शाळांमधील मुलांना उच्च प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता पहिली आणि पाचवीपासून सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासकीय अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी सांगितले.