कडाक्याच्या थंडीने तूर धोक्यात

By Admin | Updated: December 28, 2014 01:02 IST2014-12-28T01:02:51+5:302014-12-28T01:02:51+5:30

थंडीमुळे तुरीच्या पिकाचा फुलोर गळत आहे.

Fierce threat of cold weather | कडाक्याच्या थंडीने तूर धोक्यात

कडाक्याच्या थंडीने तूर धोक्यात

अकोला : गत दोन आठवड्यांपासून कडाक्याची थंडी सुरू असून, या थंडीमुळे तुरीच्या पिकाचा फुलोर गळत आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना तुरीचेही उत्पादन होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीन पीक हातचे गेले, तर मुगाचे उत्पादनच झाले नाही. सध्या कपाशीवर विविध प्रकारच्या अळया व किड्यांनी आक्रमण केल्याने कपाशीचे पीकही पाण्यात गेले. आता तुरीच्या अपेक्षेवर जगत असलेला शेतकरी तुरीचे पीकही धोक्यात आल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. थंडीचा कडाका प्रचंड असून यामूळे तुरीच्या पिकाचा फुलाराला गळती लागली आहे. या गळतीसोबतच तूर करपणे सुरू झाले असल्याचे चित्र आहे. हातात येणारे पीक शेतकर्‍याच्या डोळ्यापुढे चालले आहे.

Web Title: Fierce threat of cold weather