जुना भाजी बाजारात भीषण अग्नितांडव; पाच दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:12 IST2021-03-29T04:12:17+5:302021-03-29T04:12:17+5:30

गॅस सिलिंडरचा झाला स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जुना भाजी बाजारातील ...

A fierce firestorm in the old vegetable market; Burn five shops | जुना भाजी बाजारात भीषण अग्नितांडव; पाच दुकाने जळून खाक

जुना भाजी बाजारात भीषण अग्नितांडव; पाच दुकाने जळून खाक

गॅस सिलिंडरचा झाला स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जुना भाजी बाजारातील सिंधी मार्केटमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत न्यू भगवती ट्रेडर्स, शिवगंगा कन्फेक्शनरी या दुकानांसह पाच दुकाने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही.

जुना भाजी बाजार परिसरात असलेल्या सिंधी मार्केटमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण समोर आले नाही. या आगीची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या पानाच्या ८ बंबांद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीवर तब्बल दोन ते तीन तासांनंतर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. घटनास्थळाला पोलीस, महसूल व महानगरपालिका प्रशासनाने भेट देऊन पंचनामा सुरू केला. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: A fierce firestorm in the old vegetable market; Burn five shops