‘श्री’चा प्रकटदिन झाला लोकोत्सव

By Admin | Updated: February 11, 2015 01:11 IST2015-02-11T01:11:28+5:302015-02-11T01:11:28+5:30

बुलडाणा जिल्हात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनातून सेवेचा श्रद्धाभाव.

Festival of 'Shree' was celebrated | ‘श्री’चा प्रकटदिन झाला लोकोत्सव

‘श्री’चा प्रकटदिन झाला लोकोत्सव

फहीम देशमुख /शेगाव: नि:स्वार्थ भावनेने केले जाणारे सेवाकार्य व कमालीची स्वच्छता यासाठी देशभरात शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचा लौकिक आहे. बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात जवळपास प्रत्येक गावात महाप्रसाद व पूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला असल्याने, हा लौकिक ङ्म्रद्धा व सेवेचा असल्यामुळे प्रगटदिन उत्सव हा लोकोत्सव झाला आहे. श्री गजानन महाराज संस्थानप्रमाणे श्रींचे भक्त ही शेगावात येणार्‍या मार्गांंवर ठिकठिकाणी सेवा करतात. नागपूर, अकोला, अकोट, बाळापूर, खामगाव आदी भागांतील दानशूर भक्तमंडळी उत्सवाच्या काळात शेगावी येऊन शहरात पोहोचणार्‍या वारकर्‍यांसह भक्तांची विविध प्रकारे सेवा करतात. नागपूरच्या टिमकी येथील श्री गजानन सेवा समिती, शेगाव येथील गजानन भक्त मंडळ हे भक्तांच्या चरण सेवे पासून तर सतत तीन दिवस महाप्रसादाची व्यवस्था ते करतात. याशिवाय शहरात येणार्‍या मार्गांंंवर अकोला, अकोट, खामगाव येथील भक्तमंडळी पायी जाणार्‍या वारकर्‍यांसाठी फराळ, महाप्रसाद, चहा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असता त. हीच शिस्त आणि स्वच्छता पालखी सोहळ्यातही पाहावयास मिळते. पालखीमध्ये सहकारी वारकर्‍यांना ठिकठिकाणी शीत पेय आणि खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात येते. शीतपेय पिल्यानंतर ग्लास रस्त्यावर फेकून न देता काही सेवक हे वापरलेले ग्लास एका ठिकाणी गोळा करतात. प्रकटदिनाच्या निमित्ताने शहरात लाखाच्यावर भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंंत एक हजारांच्या जवळपास पाल ख्यांनी शहर गाठले असून या भक्तांची आबाळ होणार नाही, याची दक्षता ठिकठिकाणी घेतली जात आहे.

Web Title: Festival of 'Shree' was celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.