लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशू दक्षता कक्षामध्ये ए िप्रल २0१६ ते २0१७ या वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृ त्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू होणे गंभीर घटना असल्याचा निषेध काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करीत, सोमवारी दुपारी स्त्री रुग्णालयासमोर निदर्शने केली आणि स्त्री रुग्णालयाच्या कारभाराविरुद्ध घोषणा दिल्या. एका वर्षामध्ये ४५१ नवजात बालकांचा स्त्री रुग्णालयात मृत्यू झाल्याच्या प्रकाराची मानवाधिकार आयोगाने दखल घेऊन राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. स्त्री रुग्णालयात शिशू दक्षता कक्ष असूनही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. राज्य शासन आणि आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याचे यातून दिसून येते. जनतेच्या आरोग्यावर शासन कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते; परंतु आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी रुग्णांच्या उपचारांबाबत गंभीर नाहीत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली आणि शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काँग्रेस पदाधिकार्यांनी स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तरंगतुषार वारे यांना निवेदन सादर केले. निदर्शनामध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, अविनाश देशमुख, संजय मेश्रामकर, नगरसेवक मोहम्मद इरफान, पराग कांबळे, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, खिजर खान, तश्वर पटेल, नरेंद्र देशमुख, इस्माईल टिव्हीवाला, सैयद शहजाद, माजी नगरसेविका सुषमा निचळ, पुष्पा गुलवाडे, इरफान कासमानी, नागसेन सिरसाट, डॉ. वर्षा बडगुजर, पिंटू बोर्डे आदी सहभागी झाले होते.
स्त्री रुग्णालयात शिशू दगावले; काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:30 IST
जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशू दक्षता कक्षामध्ये ए िप्रल २0१६ ते २0१७ या वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृ त्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू होणे गंभीर घटना असल्याचा निषेध काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करीत, निदर्शने केली.
स्त्री रुग्णालयात शिशू दगावले; काँग्रेसची निदर्शने
ठळक मुद्देवर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृत्यू एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू होणे गंभीर घटना