महिलेस मारहाण करणा-यास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 01:44 IST2016-07-20T01:44:38+5:302016-07-20T01:44:38+5:30
आपातापा येथील महिलेस मारहाण करणा-या आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.
_ns.jpg)
महिलेस मारहाण करणा-यास शिक्षा
अकोला: आपातापा येथील रहिवासी असलेल्या एका महिलेस अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणार्या आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंडही आरोपीस न्यायालयाने ठोठावला आहे. आपातापा येथील रहिवासी रंजना प्रकाश बोपटे या महिलेस २४ नोव्हेंबर २0१३ रोजी गजानन सुखदेव बोपटे त्याचा मुलगा संजय आणि मुलगी शीला या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. या प्रकरणी रंजना बोपटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन बोपटे, शीला बोपटे आणि संजय बोपटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. ठाकरे यांच्या न्यायालयाने पाच साक्षीदार तपासल्यानंतर गजानन बोपटे याच्याविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून त्याला कलम ५0४ अन्वये ३ महिन्यांची शिक्षा आणि ५00 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी १५ दिवसांची शिक्षा न्यायालयाने सुनावली तर कलम ३२३ अन्वये एक महिन्याची शिक्षा आणि ५00 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सात दिवसांची शिक्षा न्यायालयाने आरोपीस सुनावली.