पुण्याचे फय्याज शेख आणि रूपेश जगताप विजेता

By Admin | Updated: November 24, 2015 01:34 IST2015-11-24T01:34:20+5:302015-11-24T01:34:20+5:30

अकोला येथे अखिल भारतीय खुली कॅरम स्पर्धा.

Fayyaz Shaikh and Rupesh Jagtap winners of Pune | पुण्याचे फय्याज शेख आणि रूपेश जगताप विजेता

पुण्याचे फय्याज शेख आणि रूपेश जगताप विजेता

अकोला: पुण्याच्या फय्याज शेख आणि रू पेश जगताप जोडीने भुसावळच्या सय्यद रिजवान आणि अनिल मोरे जोडीचा २५-६, २५-९ असा पराभव करू न अखिल भारतीय खुली कॅरम स्पर्धा-२0१५ चे विजेतेपद मिळविले. रविवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहात स्पर्धेतील दुहेरी प्रकारातील अंतिम लढत पुणे आणि भुसावळच्या कॅरमपटूंमध्ये झाली. तिसर्‍या स्थानावर मुंबईचे फैजान आणि बाबूलाल श्रीमाळ, चौथ्या स्थानावर मुंबईचेच सुरेश के. आणि सतीश सिरसाट, पाचव्या स्थानावर अकोल्याचे एजाज खान आणि मोहम्मद इलियास, सहाव्या स्थानावर पातूरचे फिरोज खान आणि सय्यद हसन, सातव्या स्थानावर नागपूरचे इरशाद आणि समीर, आठव्या स्थानावर जळगावचे सय्यद बबलू व सय्यद सलीम यांची जोडी राहिली. व्हाइट स्लॅम मनमाडचे संतोष बी. प्रथम, अकोल्याचे अकिल पहेलवान द्वितीय, फिरोज लाखन तृतीय आणि फैयाज शेख यांनी चतुर्थ स्थान मिळविले. एकेरी प्रकारात नागपूरचे इरशाद अहमद प्रथम, पुण्याचे फय्याज शेख द्वितीय, जळगावचे एस.एम.कासीम तृतीय, अकोल्याचे सतीश शर्मा चतुर्थ, भुसावळचे अनिल मोरे पाचव्या, अकोल्याचे मोहम्मद इलियास सहाव्या, पुसदचे समीर सातव्या आणि अकोल्याचे फिरोज लाखन यांनी आठवे स्थान मिळविले. स्पर्धेतील विजेत्यांना माजी क्रीडा राज्यमंत्री अजहर हुसैन, अँड. मोतिसिंह मोहता, कमल चिमा, श्याम अवस्थी यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आयोजक करण चिमा यांनी केले.

Web Title: Fayyaz Shaikh and Rupesh Jagtap winners of Pune