कोरानामुळे पिता-पुत्राचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:38+5:302021-05-16T04:17:38+5:30

शिवर येथील रहिवासी गोपाल भास्करराव वैराळे(५०) यांना व त्यांचे वडील भास्करराव वैराळे(७२) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ...

Father-son death due to Korana! | कोरानामुळे पिता-पुत्राचा मृत्यू!

कोरानामुळे पिता-पुत्राचा मृत्यू!

शिवर येथील रहिवासी गोपाल भास्करराव वैराळे(५०) यांना व त्यांचे वडील भास्करराव वैराळे(७२) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु दोघाही पिता-पुत्राची प्रकृती खालावत गेली. गोपाल वैराळे यांचे १० मे रोजी उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवर येथे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडत नाही, तोच, त्यांचे वडील भास्करराव वैराळे यांचा कोरोनामुळे १२ मे रोजी मृत्यू झाला. त्यामुळे वैराळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गोपाल वैराळे हे घरातील कर्ता पुरूष हाेते. त्यांच्या अचानक निघुन जाण्यामुळे कुटूंबासमोर अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

गोपाल वैराळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. दोघाही पिता-पुत्राच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारच गेला आहे.

फोटो:

Web Title: Father-son death due to Korana!