बाप-लेकास सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:10 IST2017-08-25T01:10:13+5:302017-08-25T01:10:36+5:30
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका इसमावर हल्ला करणार्या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

बाप-लेकास सात वर्षांचा कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका इसमावर हल्ला करणार्या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
लोहारा येथील रहिवासी महादेव हिंमतराव तायडे त्यांचे वडील हिंमतराव तायडे व भाऊ संतोष तायडे यांच्यावर क्षुल्लक कारणावरून काशीनाथ यशवंत जंजाळ आणि राजेश काशीनाथ जंजाळ या दोघांनी २९ सप्टेंबर २0१५ रोजी सकाळी कुर्हाड व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर ज खमी झालेल्या तायडे पिता-पुत्रास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जखमी महादेव तायडे यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी काशीनाथ यशवंत जंजाळ आणि राजेश काशीनाथ जंजाळ या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने या प्रकरणात ११ साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही आरोपीविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून कलम ३0७ अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ५00 रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. कलम ३२४ अन्वये दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५00 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयाने जंजाळ पिता-पुत्रास सुनावली.
बाप-लेकाचे वेडसर असल्याचे नाटक
या प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी राजेश काशीनाथ जंजाळ हा वेडसर असल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याची नागपूर येथील रुग्णालयात तपासणी केली असता तो वेडसर नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचे वडील काशीनाथ यशवंत जंजाळनेसुद्धा वेडसर होण्याचे नाटक केले; मात्र त्याचीही तपासणी केल्यानंतर हे दोघेही वेडसर नसल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. त्यामुळे या प्रकरणातून वाचण्यासाठी बाप-लेकाने हा आटापिटा केल्याचे समोर आले.
दुचाकीवर पडल्याने जखमी झाल्याचा आरोप
या प्रकरणातील जखमी तायडे कुटुंबीय हे दुचाकीवरून पडल्याने जखमी झाल्याचा आरोप जंजाळ पिता-पुत्राने केला; मात्र ११ साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने जंजाळ खोटे बोलत असल्याचे सांगत त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.