पित्यानेच केली चिमुकलीची हत्या !

By Admin | Updated: April 29, 2016 02:02 IST2016-04-29T02:02:51+5:302016-04-29T02:02:51+5:30

पती-पत्नीमध्ये होता वाद; शनिवारपर्यंत कोठडी.

Father killed a sperm! | पित्यानेच केली चिमुकलीची हत्या !

पित्यानेच केली चिमुकलीची हत्या !

खामगाव (जि. बुलडाणा): पत्नीशी झालेल्या वादातून तीन महिन्याच्या चिमुकलीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करणार्‍या नराधम बापास पोलीसांनी अटक केली. नांद्री येथे २७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. दरम्यान, न्यायालयाने आरोपीस ३0 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
लहू दगडू धंदरे याचा पत्नी लतासोबत वाद होता. या वादातून लता माहेरी निघून गेली होती. लता धंदरे अंगणात झोपली असताना रात्री उशिरा तीन महिन्यांची मुलगी सोनालिका जवळ नसल्याने तिचा शोध घेण्यात आला. यावेळी घरापासून काही अंतरावर या चिमुरडीचा गळ्य़ावर वार केलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयावरून लताच्या पतीस ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच लहू दगडू धंदरेने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी लहू धंदरे यास २८ एप्रिल रोजी खामगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ३0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Father killed a sperm!