माजी नगरसेवकाच्या वडिलांनी जाळून घेतले

By Admin | Updated: December 26, 2014 01:08 IST2014-12-26T01:08:11+5:302014-12-26T01:08:11+5:30

आजाराला कंटाळून घेतली टोकाची भूमिका.

The father of the former corporator burnt the house | माजी नगरसेवकाच्या वडिलांनी जाळून घेतले

माजी नगरसेवकाच्या वडिलांनी जाळून घेतले

अकोला : माजी नगरसेवक विलास शेळके यांच्या वडिलांनी आजारा कंटाळून टोकाची भूमिका घेत जाळून घेतल्याची घटना बुधवारी रात्री १.३९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
डाबकी रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुकानगरमध्ये राहणारे भाजपचे माजी नगरसेवक विलास शेळके यांचे वडील सुपडाजी प्रल्हाद शेळके(७५) यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास स्वत:स जाळून घेतले. यात गंभीररित्या भाजल्याने त्यांना उपचारार्थ अमानखाँ प्लॉटमधील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रूग्णालयातील वॉर्डबॉय प्रकाश नागोराव धने(५७) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली. सुपडाजी हे काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होते. आजाराला कंटाळूनच त्यांनी हे पाऊल उचलले.

Web Title: The father of the former corporator burnt the house