बाप रे बाप, तापच ताप!

By Admin | Updated: July 28, 2014 01:55 IST2014-07-28T01:27:27+5:302014-07-28T01:55:52+5:30

अकोला जिल्ह्यातील खासगीसह शासकीय रुग्णालये हाऊसफुल; आरोग्य विभागाकडून उपाययोजना नाहीत.

Father, father, fever! | बाप रे बाप, तापच ताप!

बाप रे बाप, तापच ताप!

सचिन राऊत / अकोला
ढगाळ वातावरण, लगेच रिमझिम पाऊस एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा कडाक्याचं उन्हं. या वातावरणातील चढ-उतारामुळे जिल्हय़ात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगीसह शासकीय रुग्णालये हाउसफुल्ल झाली असली तरी आरोग्य विभागाच्या लेखी मात्र अद्याप जिल्हय़ात सर्व काही ठिक आहे.
पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. झडीचे वातावरण आणि लगेच कडाक्याचं उन्हं, अशा विरोधाभासी वातावरणामुळे जलजन्य व कीटकजन्य आजारासोबतच कावीळ आणि चेहर्‍यावर ह्यमसह्णची साथ असल्याची माहिती शहरासह जिल्हय़ातील डॉक्टर व शासकीय रुग्णालयांमधून घेतलेल्या माहितीमधून समोर आली आहे. अकोला शहरासह जिल्हय़ात कावीळ व अज्ञात तापाचीही साथ आहे. लहान मुले व वृद्धांसह अनेकांना कावीळ आजार तसेच अज्ञात तापाने त्रस्त केले आहे. या वातारवणामुळे दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढला असून, श्‍वसन व घशाच्या आजारांसोबतच डेंग्यू, सर्दी, ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घशात खवखव होणार्‍या रुग्णांचा त्रास या वातावरणातील बदलामुळे वाढला असून, घशातील खवखव जास्त दिवस राहिल्यास इतर गंभीर आजार होण्याचा धोका संभत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. डोळय़ांची जळजळ होत असल्यास या आजारांकडेही दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करून प्यावे, बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग करावा. या काळात डासांची उत्पत्ती प्रचंड होत असल्याने मुलांचे डासांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तेलकट अन्नपदार्थ पावसाच्या दिवसांमध्ये खाऊ नयेत, असे अहवान जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
*सवरेपचारमध्ये रुग्णांची गर्दी
सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असून, या ठिकाणी ७00 च्यावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये डायरिया, मलेरिया, मळमळ होणे यासारखे आजार असलेले रुग्ण अधिक आहेत. यासोबतच मेंदूचा हिवताप, डेंगी ताप व अशक्तपणा आल्यामुळे तब्बल ४२४ रुग्ण सवरेपचारमध्ये दाखल झाले आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी सवरेपचारमध्ये येणार्‍या रुग्णांची संख्या वाढतच आहे.

Web Title: Father, father, fever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.