सायखेड : मुलाच्या आत्महत्येनंतर हताश झालेल्या वडिलानेसुद्धा नैराश्यापाेटी गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २५ डिसेंबर राेजी बार्शिटाकळी तालुक्यातील शिंदेखेड माेरेश्वर येथे घडली. संजय सहदेव नवलकार यांनी घराशेजारी असलेल्या गाववाड्यात जाऊन गळफास घेतला. त्यांचा एकुलता एक मुलगा राेहित (वय २१) याची सैन्यात भरती हाेण्याची इच्छा हाेती. तशी तयारीसुद्धा त्याने केली हाेती. परंतु दुर्दैवाने त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याने हातात राॅड टाकण्यात आला. त्यामुळे राेहितचे सैन्यात जाण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे त्याने भाऊबिजेच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा धक्का वडील संजय नवलकार यांना बसला. एकुलता एक मुलगा गेल्याचे दु:ख सहन न झाल्याने त्यांनीही आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात असलेल्या पत्नी व मुलीवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
मुलापाठाेपाठ वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 11:14 IST
Suicide News संजय सहदेव नवलकार यांनी घराशेजारी असलेल्या गाववाड्यात जाऊन गळफास घेतला.
मुलापाठाेपाठ वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देमुलगा राेहित (वय २१) याने भाऊबिजेच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली.मुलगा गेल्याचे दु:ख सहन न झाल्याने त्यांनीही आत्महत्येचे पाऊल उचलले.