उष्माघाताने विद्यार्थिनीचा मृत्यू
By Admin | Updated: May 6, 2015 01:00 IST2015-05-06T01:00:54+5:302015-05-06T01:00:54+5:30
तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू.

उष्माघाताने विद्यार्थिनीचा मृत्यू
तेल्हारा : तालुक्यातील रायखेड येथील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मंगळवारी मृत्यू झाला. दीपली सुरेश नेमाडे (८) हे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती तेल्हारा येथील सेठ बंसीधर विद्यालयात इयत्ता तिसरीत शिकत होती.
प्रकृती बिघडल्याने तिला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. तिची प्राणज्योत मालविली.