बोरगाव मंजू येथे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:59+5:302021-02-05T06:14:59+5:30
स्थानिक सिद्धार्थनगरातील बौद्ध विहार परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवावे, विहारासमोर वाहत असलेल्या सांडपाण्याचे नियोजन करावे आदी मागण्या करीत आम्रपाली महिला ...

बोरगाव मंजू येथे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू!
स्थानिक सिद्धार्थनगरातील बौद्ध विहार परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवावे, विहारासमोर वाहत असलेल्या सांडपाण्याचे नियोजन करावे आदी मागण्या करीत आम्रपाली महिला उपासिका संघ तथा पूज्य भन्ते शीलरत्न यांनी सोमवार, दि. २५ जानेवारीपासून सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
स्थानिक सिद्धार्थनगरातील बौद्ध विहार परिसरात अतिक्रमण वाढले आहे. तसेच विहारासमोरील नाल्याचे बांधकाम अर्धवट असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. विहाराला लागून असलेले अतिक्रमण व नाल्याचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करीत सोमवारी पूज्य भन्ते शीलरत्न व आम्रपाली महिला उपासिका संघातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणात शोभाताई वानखडे, सुमनबाई वानखडे, ललिता सरदार, रत्नाबाई तायडे, रंजना सोनोने, मालाबाई तायडे, सिंधुबाई तायडे, शशिकला चौरपगार, विजूबाई वानखडे, सुजाता सरदार यांच्यासह महिलांचा समावेश आहे. (फोटो)