सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपाचा ‘फार्स’च!

By Admin | Updated: July 26, 2016 02:07 IST2016-07-26T01:49:22+5:302016-07-26T02:07:20+5:30

पेरणी आटोपली: शेतक-यांची मागणीच नाही!

FARS to allocate seeds to government free Cotton! | सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपाचा ‘फार्स’च!

सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपाचा ‘फार्स’च!

संतोष येलकर/अकोला
पीक कर्ज मिळण्यास अपात्र असलेल्या राज्यातील कापूस उत्पादक २१ जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटपाचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला तरी, खरीप पेरणी आटोपल्याने, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मोफत कपाशीच्या बियाण्यांस शेतकर्‍यांकडून मागणी नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटपाचा सरकारचा निर्णय ह्यफार्सह्णच ठरला आहे.
सन २0१२-१३ व २0१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची परतफेड केली नसल्याने, सन २0१६ यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळण्यासाठी थकबाकीदार राज्यातील ६ लाख ७१ हजार शेतकरी अपात्र आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक २१ जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांपैकी कपाशीची पेरणी करू न शकलेल्या शेतकर्‍यांना कमाल एक एकराच्या क्षेत्र र्मयादेत कापूस बियाण्याची प्रत्येकी दोन पाकिटे मोफत वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन विभागामार्फत गत ५ जुलै रोजी घेण्यात आला. शासनाचा हा निर्णय ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी,कृषी विभागाच्या कार्यालयांना प्राप्त झाला; परंतु यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्यानंतर मोफत बियाण्याचा निर्णय प्राप्त झाल्याने, मोफत कपाशी बियाण्यासाठी शेतकर्‍यांकडून मागणी नाही. या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करण्याचा सरकारचा हा निर्णय केवळ ह्यफार्सह्णच ठरल्याचे चित्र आहे.

अमरावती विभागात बियाणे वाटपास सुरुवातही नाही!
शासनाच्या निर्णयानुसार कापूस उत्पादक राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व चंद्रपूर इत्यादी २१ कापूस उत्पादक जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करावयाचे आहे; परंतु खरीप पेरण्या आटोपल्याने, मोफत कपाशी बियाण्यास शेतकर्‍यांकडून मागणी नाही. त्यामुळे अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपास अद्याप सुरुवातही झाली नाही. मोफत बियाणे वाटपासंबंधीचा अहवाल अद्याप अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे विभागात मोफत कपाशी बियाणे वाटप सुरू करण्यात आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: FARS to allocate seeds to government free Cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.