शेती कर्जाधारित न होता मूल्याधारित व्हावी- पालकमंत्री
By Admin | Updated: September 5, 2015 01:49 IST2015-09-05T01:49:56+5:302015-09-05T01:49:56+5:30
महाराजस्व विस्तारित समाधान शिबिर; लवकर वीज जोडणी देण्याचे शासनाचे प्रयत्न.

शेती कर्जाधारित न होता मूल्याधारित व्हावी- पालकमंत्री
मूर्तिजापूर : शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. शेतकर्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने या बाबीची गंभीर दखल घेण्यात आली असून, लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे प्रयत्न आहे. शेतकर्यांची शेती ही कर्जाधारित न होता मूल्याधारित व्हावी असाच शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. मूर्तिजापूर येथे ४ सप्टेंबर रोजी आयोजित महाराजस्व विस्तारित समाधान शिबिरप्रसंगी ते बोलत होते.
या विस्तारित समाधान योजना शिबिराच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते तर आ. हरिष पिंपळे, पं.स. सभापती शुभांगी खंडारे, नगरसेवक गोपी ठाकरे, नगराध्यक्ष पवन अव्वलवार, जि.प. सदस्य रवींद्र गोपकर, देवानंद गणोरकर, पं.स. उपसभापती उमेश मडगे, नगरसेविका स्नेहा नाकट, पं.स. सदस्य स्मिता गावंडे, प्रभारी जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह, अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन निपाणे, आत्मा प्रकल्प संचालक तळवी, मूर्तिजापूरचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे,बाश्रीटाकळीचे तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार वैभव फरताडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिरात महिला व बालकल्याण विभागाच्या योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.शाहीर मधुकर नावकार आणि श्याम कोल्हाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांंना धनादेश वितरित करण्यात आले.
पालकमंत्री, आमदारांनी केले शिबिराचे 'समाधान'
विस्तारित समाधान शिबिरात मूर्तिजापूर व बाश्रीटाकळी तालुक्यातील एकूण २८४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारकर्त्यांंचे म्हणणे ऐकून स्थानिक पातळीवरील तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात आला. तसेच काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना निर्देश देण्यात आले.पालकमंत्री डॉ.रणजित पाटील आणि आमदार हरिष पिंपळे यांनी दिवसभर,तसेच सायंकाळी उशिरापर्यंंत प्रत्येक तक्रारकर्त्यांंचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्यसमाधानह्ण शिबिर यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये उमटल्या.
विविध स्टॉलद्वारे दिली योजनांनी माहिती
समाधान शिबिरप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते.मूर्तिजापूर नगरपरिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, महावितरण, कृषी विभाग, भूमी अभिलेख, सर्व शिक्षा अभियान अशा अनेक स्टॉल्समधून योजनांची माहिती देण्यात आली.