सोयाबिन बियाण्याच्या टंचाईने शेतकरी चिंतेत
By Admin | Updated: May 11, 2014 22:06 IST2014-05-11T21:57:05+5:302014-05-11T22:06:07+5:30
कपाशीचा पेरा कमी झाला आणि त्याची जागा सोयाबीनने घेतली

सोयाबिन बियाण्याच्या टंचाईने शेतकरी चिंतेत
साखरडोह : साखरडोह व परिसरातील सिंगडोह, सिंगणापूर, हळदा, रोहणा, वार्डा, गिर्डा,चिखलागड, खापरदरी व इतर गावामध्ये काही वर्षापूर्वी कपाशीचा पेरा मोठय़ा प्रमाणात होता. परंतु परिसरात कपाशीचा पेरा कमी झाला आणि त्याची जागा सोयाबीनने घेतली. गेल्या वर्षी सोयाबीनच्या प्रती बॅगचे भाव २000 रुपयाच्या जवळ पास होते ते या वेळेस ३000 रुपयेपर्यंत वाढले आहेत. ऐन सोयाबीन काढायला आले आणि पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे सोयाबीन भिजल्या गेले व त्याची उगवण क्षमता कमी झाली. म्हणून जिल्हय़ात सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होणार आहेत. त्यातच परिसरात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढतच आहे. शेतकरी बांधव कपाशीला लागणरा खर्च, मिळणारा कमी भाव, मजुरांची कमतरता या सगळय़ाला कंटाळून यंत्राच्या साहाय्याने काम करता येत असलेल्या सोयाबीनच्या पिकाकडे वळले आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी परिसरात सोयाबीनचा पेरा वाढणार आहेत. त्यातच यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई भासणार असल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत.