पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण!
By Admin | Updated: May 14, 2017 04:26 IST2017-05-14T04:26:12+5:302017-05-14T04:26:12+5:30
अकोला जिल्ह्यात शनिवारी दुपारी अनेक ठिकाणी वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली.

पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण!
अकोला : जिल्ह्यात शनिवारी दुपारी अनेक ठिकाणी वळिवाच्या पावसाने शेतकर्यांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांसह वीट उत्पादकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
नेर धामणा, सांगवी हिवरे, निराट वैराट, राजापूर परिसरात सायंकाळी ५.३0 वाजता जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वीट उद्योग, कांदा, टरबूज तसेच इतर रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वीट उद्योजकांच्या लाखो रुपयांच्या कच्च्या विटाचे नुकसान झाले. आगर परिसरात तुरळक पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजता ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळ वार्यासह पाऊस पडला.
त्यामुळे ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पातूर तालुक्यात शिर्ला व आलेगाव येथेही पावसाचे आगमन झाले. मूर्तिजापूर तालुक्यात लाखपुरीला व करतखेडा येथे शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात क ाढून ठेवलेला कांदा, भुईमूग व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
बोरगाव वैराळे परिसरात पाऊस
बोरगाव वैराळे, हातरुण परिसरात सायंकाळी ५.३0 वाजताच्या दरम्यान विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, अंदुरा परिसरातील शेतकर्यांच्या कांदा पिकाला या पावसामुळे फटका बसणार असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. सतत पाच वर्षांपासून या परिसरातील शेतकरी कधी अवर्षण, कधी अतवृष्टी या संकटातून सुटला तर अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडत असतो.