शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात  फळ पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:18 IST

अकोला : मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

अकोला : विदर्भात गतवर्षी पूरक पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम आता फळ पिकांवर होत असून, फळबागा वाचविण्यासाठी कृषी विद्यापीठासह शेतकºयांना आटापिटा करावा लागत आहे. मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील प्रशासनाने ५० टक्क्यांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास अगोदरच प्रतिबंध घातला होता. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतकºयांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.विदर्भात संत्र्याचे सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर क्षेत्र आहे; परंतु पूरक पाऊस न झाल्याने वातावरणात आर्द्रता नाही. तसेच पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यात केळीचे क्षेत्र ८२ हजार हेक्टर असून, द्राक्षे ९० हजार, पेरू ३९ हजार, आंबा ४८२ हजार, पपई १० हजार, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार, चिकू ७३ हजार व इतर फळ पिके ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहेत. रोजगार हमी योजना व राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत या राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे. म्हणूनच फळ पिकांबाबत महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु ५० फूट खोलीवर लागणारे पाणी आता ३०० ते ३५० फूट खोल जाऊनही लागत नसल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले.यावर्षीच्या उन्हाळ््यात आतापासूनच तापमान प्रचंड वाढल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. संत्र्याचे पीक गारपिटीने एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे पाणी नसल्याने झाडाला लागलेली संत्री पिवळी पडत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने टॅँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- पावसाचे दिवस कमी झाले असून, भूगर्भातील पातळी खोल गेली आहे. त्याचे हे परिणाम आहेत आता पाण्याची बचत करावी लागणार असून, भूगर्भात जलसाठा साठविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपचार करावे लागणार आहेत.- डॉ. सुभाष टाले,विभागप्रमुख, मृद व जल संधारण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ