कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांची दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:28 IST2017-08-24T01:28:06+5:302017-08-24T01:28:14+5:30
अकोला : शासनाने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी करण्यात आली असून, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांची दमछाक होत असल्याच्या प्रश्नावर शिवसेना पदाधिकार्यांनी बुधवारी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेत, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी मांडल्या.

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांची दमछाक!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी करण्यात आली असून, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांची दमछाक होत असल्याच्या प्रश्नावर शिवसेना पदाधिकार्यांनी बुधवारी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेत, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी मांडल्या.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खा.अरविंद सावंत यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्यांकडून‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी केली असता, ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असून, एका शेतकर्याला कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी किमान तासाचा अवधी लागत आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरताना बायोमॅट्रिक मशीनवर संबंधित शेतकर्यासह पत्नीचा अंगठा आवश्यक असून, एक अर्ज भरण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येत आहे. सर्व्हर डाउन असल्याने १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना येणार्या अडचणींमुळे शेतकर्यांची दमछाक होत असल्याच्या प्रश्नावर शिवसेनच्या जिल्हा पदाधिकार्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे धाव घेत, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील अडचणी जिल्हाधिकार्यांसमोर मांडल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, प्रदीप गुरुखुद्दे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, दिनेश सरोदे, राहुल कराळे, अभिषेक खरसाळे, नगरसेवक मंगेश काळे, केदार खरे, सुनील डुकरे, सचिन थोरात, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गीया, रामा भांडे, प्रशांत अढाऊ, नकूल ताथोड, देवश्री ठाकरे, किशोर ठाकरे, योगेश अग्रवाल यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.
नवीन बायोमॅट्रिक मशीन लावण्याचे निर्देश
कर्जमाफीसाठी योजनेत ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी तातडीने सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी शिवसेना पदाधिकार्यांना दिले. तसेच ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांचा अंगठा घेण्यासाठी नवीन ३६३ बायोमॅट्रिक मशीन तातडीने सेतू केंद्रांवर कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्यांना देत ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या.