नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: April 10, 2016 01:39 IST2016-04-10T01:39:20+5:302016-04-10T01:39:20+5:30
पातूर तालुक्यातील युवा शेतक-याने घेतला गळफास.

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
पातूर (अकोला): सततची नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून पातूर तालुक्यातील बेलुरा खुर्द येथील एका युवा शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, ९ एप्रिल रोजी उघडकीस आली.
रवी गजानन मोकळकर हे मृताचे नाव आहे. त्याच्याकडे १0 एकर शेती आहे. गत काही वर्षांपासून पीक हुलकावणी देत असून, यावर्षीही दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन मिळाले नाही. या परिस्थितीला कंटाळून रवी मोकळकर यांनी त्यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी मोकळकर यांच्यावर बँक अथवा सावकारी कर्ज होते का, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पातूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.