नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: April 2, 2016 00:52 IST2016-04-02T00:52:32+5:302016-04-02T00:52:32+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; ६५ हजारांचे होते कर्ज.

The farmer's suicide in a tainted napki | नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

साखरखेर्डा (जि. बुलडाणा): येथून जवळच असलेल्या गुंज येथील ३२ वर्षीय युवा शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून शेतातच आत्महत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री घडली. मदन शेषराव तुपकर (३२) यांच्याकडे अडीच एकर शेती असून, शेतीत होणार्‍या उत्पादनावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. गत चार वषार्ंपासून शेतात नापिकीमुळे मदन तुपकर रोजमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. कुठलीही आर्थिक मदत न घेता त्यांनी कुक्कुट पालनाचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता; मात्र २८ मार्चला सैलानी यात्रेत विक्रीसाठी कोंबड्या नेताना उष्माघाताने २00 कोंबड्या मृत पावल्या. यात त्यांचे ३0 हजारांचे नुकसान झाले. स्टेट बँकेचे ३५ हजारांचे कर्ज, ३0 हजारांचे नुकसान आणि शेतीची नापिकी यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. याच विवंचनेत त्याने ३१ मार्च रोजी गुंज शेतशिवारात कीटकनाशक प्राशन केले. मदन यांना तातडीने प्रथम साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले, असता त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना बुलडाणा नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोठय़ा शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The farmer's suicide in a tainted napki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.