विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: June 1, 2015 02:48 IST2015-06-01T02:07:35+5:302015-06-01T02:48:31+5:30
मातोळा तालुक्यातील शेतक-याने संपवली जीवनयात्रा.

विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
मोताळा (बुलडाणा): गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका शेतकर्याचा मृतदेह रविवारी त्याच्याच शेतात आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळून आल्याने, त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. शेतकरी आत्महत्येची ही घटना कोल्ही गवळी येथे घडली. संजय पुंडलीक शिंदे हे मृत शेतकर्याचे नाव आहे. ते दोन दिवसांपासून घरी न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली होती. यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.