शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

तंत्रज्ञानात देश प्रगती करीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:29 AM

शेती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर उपाययोजना नसतील तर शिक्षण व्यर्थ आहे, अशा शब्दात पद्मभूषण परम सुपर संगणकाचे जनक व नालंदा विद्यापीठ बिहारचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी खंत व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारत हा कृषिप्रधान देश आहे. ६८ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीचे उत्पादन वाढत आहे. भारत तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करीत आहे. असे असतानाही शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या वेदनादायी आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षण घेतले, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ झालो. शेती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर उपाययोजना नसतील तर शिक्षण व्यर्थ आहे, अशा शब्दात पद्मभूषण परम सुपर संगणकाचे जनक व नालंदा विद्यापीठ बिहारचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी खंत व्यक्त केली.शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात विशेष मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दिन जव्हेरी, गणेश कंडारकर, विनायक सरनाईक, अर्चना बारब्दे, मोरेश्वर वानखडे, विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. पी.जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, अधिष्ठाता (निम्न कृषी शिक्षण) डॉ. डी. बी. उंदिरवाडे, अधिष्ठाता (उद्यानविद्या) डॉ. पी. के. नागरे, सहसंचालक कृषी सुभाष नागरे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग बोर्डाचे व्यवस्थापक (निर्यात) डॉ. सतीश वराळे, पुणे येथील सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड, प्रगतशील शेतकरी दिलीप फुके आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भटकर पुढे म्हणाले, शेतकºयांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी कृषी प्रदर्शनाची गरज आहे. रासायनिकयुक्त धान्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे. त्यासाठी जैविक, गो-आधारित शेतीकडे शेतकºयांनी वळले पाहिजे, असे सांगत, कॅन्सरसारख्या आजाराला अमेरिकेसारखा देश त्रस्त झाला असून, कॅन्सरवर उपाययोजना करण्यासाठी ते भारताकडे बघत आहेत आणि त्याचे उत्तर गो-आधारित शेती, पंचगव्य शेती व वैदिक तत्त्वावर आधारित जैविक शेतीच आहे, असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी, एकेकाळी शेती नफ्याची होती. एक क्विंटल कापसाचा भाव एक तोळे सोन्यापेक्षा अधिक होता. काळानुरूप परिस्थिती बदलली. सोन्यासोबतच इतर सर्व उत्पादनांचे भाव वाढले; परंतु शेतमालाचे भाव वाढले नाही. उत्पादनात वाढ झाली; परंतु शेतकºयाची आर्थिक स्थिती कमजोर झाली. उत्पादन खर्च वाढला. शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने धोरण ठरवून उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच शेतमालाला योग्य भाव, शेतमालाची आयात बंद करावी. तंत्रज्ञानाची जोड देऊन जैविक शेतीवर शासनाने भर द्यावा, असे मत व्यक्त केले. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी स्वर्णिम कालावधीतील विद्यापीठाच्या उपलब्धी विषयी संशिप्त आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी, तर संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले. आभार डॉ. किशोर बिडवे यांनी मानले. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ