मांडवा येथे शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: April 10, 2015 02:14 IST2015-04-10T02:14:45+5:302015-04-10T02:14:45+5:30
सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या.

मांडवा येथे शेतक-याची आत्महत्या
रिसोड (वाशिम): तालुक्यातील मांडवा येथील ७0 वर्षीय शेतकर्याने ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडलीे. ग्रामपंचायत मांडवा येथील शेतकरी ग्यानोजी मसाजी जाधव यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर शेतकर्यावर ३ वर्षांंपासून अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २0 हजार रुपये कर्ज होते. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.