कान्हेरी गवळी येथे शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 20:20 IST2017-09-21T20:19:47+5:302017-09-21T20:20:45+5:30
बाळापूर (अकोला): तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील भारत भिकाजी टकले (४0) यांनी थकीत कर्ज व नापिकीला कंटाळून २१ सप्टेंबर रोजी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

कान्हेरी गवळी येथे शेतकर्याची आत्महत्या
ठळक मुद्देशेतातील विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्राबँकेचे कर्ज फेडणे अशक्य झाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर (अकोला): तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील भारत भिकाजी टकले (४0) यांनी थकीत कर्ज व नापिकीला कंटाळून २१ सप्टेंबर रोजी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मृतक भारत टकले यांच्या आईच्या नावे दोन एकर शेती आहे. त्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाळापूर शाखेचे काढलेले पीक कर्ज नापिकीमुळे फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी गुरुवारी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.