चांदूर येथील शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: March 21, 2016 01:57 IST2016-03-21T01:57:39+5:302016-03-21T01:57:39+5:30

अकोला तालुक्यातील घटना.

Farmer's suicide in Chandur | चांदूर येथील शेतक-याची आत्महत्या

चांदूर येथील शेतक-याची आत्महत्या

अकोला: शहरालगत असलेल्या चांदूर येथील एका ४२ वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
चांदूर येथील रहिवासी शंकर वासुदेवराव जानोकार (४२) यांच्यावर बँकेसह सावकारी कर्ज आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि मुलांच्या शिक्षणासह घरखर्च भागविणेही कठीण झाल्याने या शेतकर्‍याने आत्महत्या केली. अनेक समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच असल्याने हतबल झालेल्या या शेतकर्‍याने राहत्या घरातच विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन गोंडचवर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच या प्रकरणाचा तपास त्यांनी सुरू केला.

Web Title: Farmer's suicide in Chandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.