बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: February 5, 2017 01:46 IST2017-02-05T01:46:58+5:302017-02-05T01:46:58+5:30

मोताळा तालुक्यातील घटना; कर्जाला कंटाळून गळफास घेतला.

Farmer's suicide in Buldhana | बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

मोताळा (जि. बुलडाणा), दि. ४- तालुक्यातील राजूर येथील महादेव प्रल्हाद रोठे (२८) या शेतकर्‍याने ३ फेबुवारी रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
महादेव रोठे यांच्याकडे वडिलोपार्जित शेती होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी घरात गळफास घेतला. त्यांचा सात वर्षाचा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला तेव्हा ही घटना लक्षात आली. रोठे यांच्यावर कर्ज असल्याची माहीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रोठे यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Farmer's suicide in Buldhana