मूर्तिजापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: May 16, 2017 01:28 IST2017-05-16T01:28:20+5:302017-05-16T01:28:20+5:30
मूर्तिजापूर : शेताची नोंद करून सातबाराचा उतारा मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याने येथील तहसीलदारांच्या कक्षात १५ मे रोजी सकाळी ११.४५ वाजता विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला;

मूर्तिजापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर (जि. अकोला): शेताची नोंद करून सातबाराचा उतारा मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याने येथील तहसीलदारांच्या कक्षात १५ मे रोजी सकाळी ११.४५ वाजता विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील शिपायाच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली येथील शेतकरी वासुदेव आकाराम राऊत हे त्यांच्या मुलासोबत सोमवारी सकाळी ११ वाजता मूर्तिजापूर तहसील कार्यालयात आले. त्यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीचा सातबाराचा उतारा देण्याची मागणी केली. तहसीलदार तायडे यांनी मंडळ अधिकारी मधुकर तेलगोटे यांना पाचारण करून नोंद प्रमाणित करून सातबारा देण्याविषयी सांगितले. दरम्यान राऊत हे हातात कीटकनाशकाची बाटली घेऊन आत आले व आत्महत्येचा प्रयत्न केला.