शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 20, 2017 03:59 IST2017-02-20T03:59:06+5:302017-02-20T03:59:06+5:30
येथील अल्पभूधारक शेतकरी शेखर रामभाऊ पारधी (३७) याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी

शेतकऱ्याची आत्महत्या
वाडी अदमपूर (जि. अकोला) : येथील अल्पभूधारक शेतकरी शेखर रामभाऊ पारधी (३७) याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली.
पारधी सकाळी शेतात काम करण्याकरिता जातो, असे सांगून घरून निघून गेले. त्यांनी जाफ्रापूर रस्त्यावरील राठी यांच्या शेतात असलेल्या सटवाईच्या झाडाला शर्टाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शेतमजुरांना दिसले. शेखर यांच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. सततची नापिकी, कर्ज यामुळे कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा व वडील असा परिवार आहे. (वार्ताहर)