शेतकरी पुत्राची आत्महत्या
By Admin | Updated: May 17, 2017 02:46 IST2017-05-17T02:46:37+5:302017-05-17T02:46:37+5:30
डोंगरगाव: येथील श्याम गजानन गवळी (२६) या शेतकरी पुत्राने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब १६ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली.

शेतकरी पुत्राची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरगाव: येथील श्याम गजानन गवळी (२६) या शेतकरी पुत्राने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब १६ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली.
श्याम गवळीचे वडील गजानन गवळी यांच्या नावावर तीन एकर शेतजमीन असून, त्यांच्यावर अकोल्याच्या सेंट्रल बँकेचे ३० हजार रुपयांचे पीक कर्ज आहे.
श्याम गवळीने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर त्याची माहिती मिळताच बोरगावमंजू पोलीस स्टेशनचे पो.कॉ. गणेश निमकंडे, आकन नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यास पाठविला. सदर युवकाने आत्महत्या करण्याचे नेमके कारण हे वृत्त लिहीपर्यंत समजू शकले नाही. पुढील तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत. मृतक श्याम गवळीच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, जावई असा आप्त परिवार आहे.