शेतकरी पुत्राची आत्महत्या

By Admin | Updated: October 25, 2016 03:09 IST2016-10-25T03:09:43+5:302016-10-25T03:09:43+5:30

बोर्डी येथील युवा शेतकरी पुत्राने दस-यांच्या दिवशी विष प्राशन केले होते.

Farmer's son suicides | शेतकरी पुत्राची आत्महत्या

शेतकरी पुत्राची आत्महत्या

बोर्डी (जि. अकोला), दि. २४- येथील अल्पभूधारक शेतकरीपुत्र गणेश रमेश भामोदकार (२७ )याने दसर्‍याच्या दिवशी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या युवकाचे उपचारादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. विष प्राशन केल्यानंतर गणेशला तात्काळ आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान गणेश भामोदकर याचा २४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. गणेश हा घरातील कर्ता होता. त्यांचे यावर्षी परतीच्या पावसाने शेतातील सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी ६0 ते ७0 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतच त्याने विष प्राशन केले होते.

Web Title: Farmer's son suicides