शेतकरी पुत्राची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:57 IST2016-09-28T01:57:22+5:302016-09-28T01:57:22+5:30
बाश्रीटाकळी तालुक्यातील घटना.

शेतकरी पुत्राची आत्महत्या
पिंजर (जि. अकोला), दि. २७- पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम धाकली येथील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. बाश्रीटाकळी तालुक्यातील ग्राम धाकली येथील ज्ञानेश्वर विठ्ठल घुगे वय २२ वर्षीय शेतकरी पुत्राने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत हा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या वडिलांचा काही महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. यामध्ये उपचाराकरिता बराच पैसा लागल्याने व घरी केवळ चार एकर शेती असल्याने तो नेहमी विवंचनेत राहत होता. शेतीवर बँकेचे पीक कर्ज अशा परिस्थितीत यावर्षी निसर्गाने तोंडचा घास काढल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली.