शेतकरी करणार ‘सात-बारा’ची पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 14:09 IST2017-05-14T14:09:28+5:302017-05-14T14:09:28+5:30
चावडी वाचन विशेष मोहिमेत नोंदविता येणार आक्षेप

शेतकरी करणार ‘सात-बारा’ची पडताळणी!
चावडी वाचन विशेष मोहिमेत नोंदविता येणार आक्षेप
अकोला : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार्या ई-फेरफार व ई-चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत ह्यचावडी वाचनह्णची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ह्यसात-बाराह्णमधील चुका व त्रुटीची पडताळणी शेतकरी करणार असून, सात-बारातील चुकांसंबंधी शेतकर्यांचे आक्षेप नोंदविण्यात येणार आहेत.
शेतकर्यांचा सात-बारा अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यात ई-फेरफार व ई-चावडी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये १ मे ते १५ जुलै या कालावधीत तीन टप्प्यात राबविण्यात येणार्या विशेष मोहिमेत १ ते १५ मे या कालावधीत महा-ई-सेवा केंद्र तसेच सेतू केंद्रांवर जाऊन शेतकरी ऑनलाइन सात-बारा पाहू शकतील आणि सात-बारासंबंधी काही आक्षेप असल्यास त्याबाबत संबंधित तहसीलदार व तलाठय़ांकडे लेखी पत्राद्वारे आक्षेप नोंदविता येणार आहेत. तसेच १६ मे ते १५ जून या कालावधीत चावडी वाचन मोहिमेत ह्यसात-बाराह्णची तपासणी, चुकांची दुरुस्ती व आक्षेप स्वीकारण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गाव पातळीवर चावडी वाचन कार्यक्रमात, संबंधित शेतकरी ह्यसात-बाराह्णमधील चुका व त्रुटीची पडताळणी करू शकतील आणि त्यासंबंधी आक्षेप असल्यास संबंधित तलाठी व तहसीलदारांकडे नोंदवू शकतील. १६ जून ते १५ जुलै या कालावधीत चावडी वाचन कार्यक्रमात प्राप्त तक्रारीनुसार सात-बारामध्ये प्रत्यक्ष दुरुस्ती करण्यात येणार असून, आक्षेपांचा निपटारा करण्यात येणार आहे. तक्रारी आणि आक्षेपांचा निपटारा करून, शेतकर्यांचा संगणकीकृत सात-बारा अद्ययावत करण्याच्या या मोहिमेनंतर, राज्यात शेतकर्यांना ऑनलाइन पद्धतीने सक्षम अधिकार्यांच्या डिजिटल स्वाक्षरीसह सात-बारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सात-बारा अद्ययावत करण्यासाठी ई-फेरफार व ई-चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत १ मे ते १५ जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत संगणकीकृत सात-बारा शेतकर्यांनी पाहून पडताळणी करावी आणि चुका व त्रुटीसंबंधी संबंधित तलाठी व तहसीलदारांकडे आक्षेप नोंदविणे गरजेचे आहे. आक्षेपानुसार सात-बारामध्ये दुरुस्ती करून सात-बारा अद्ययावत करण्यात येणार आहे.
-प्रमोद देशमुख
उपजिल्हाधिकारी (महसूल), अकोला.