शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळू लागली अहोरात्र वीज, अकोला जिल्ह्यात दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:22 IST

या दोन प्रकल्पांमुळे या जिल्ह्यातील १०२४ शेतकऱ्यांना आता अहोरात्र वीजपुरवठा सुरू झाला आहे. 

अकोला :  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत ०३ मेगावॉट क्षमता असलेला अकोला जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प पातूर तालुक्यातील पांगरा येथे, तर २ मेगावॉट क्षमता असलेला तिसरा सौर प्रकल्प मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन प्रकल्पांमुळे या जिल्ह्यातील १०२४ शेतकऱ्यांना आता अहोरात्र वीजपुरवठा सुरू झाला आहे. 

याअगोदर जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथील ३ मेगावॅट क्षमता असलेला सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ४५२ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.  आतपर्यंत जिल्ह्यात जलालाबाद ३ मेगावॉट, पांगरा ३ मेगावॉट आणि माना २ मेगावॉट असे एकूण ८ मेगावॉट क्षमता असलेले तीन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. 

जिल्ह्यात ६७ प्रकल्प राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यात येत आहेत. जिल्ह्यात २०४ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ६७ सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होईल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अकाेला जिल्ह्यात आतापर्यंत आठ मेगावॉट क्षमतेचे तीन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. येत्या वर्षभरात आणखी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळू शकेल.- अजितपालसिंह दिनोरे, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण 

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज