कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट!

By Admin | Updated: May 25, 2017 02:01 IST2017-05-25T02:01:36+5:302017-05-25T02:01:36+5:30

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : मध्य प्रदेशातून बियाणे आणून विनापावतीची विक्री

Farmers looted agricultural service center! | कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट!

कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट!

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती पट्टा असल्याने या भागातील शेतकरी मान्सून कपाशीची लागवड करतात; मात्र यावर्षी ६५९ हे बियाणे मिळत नसल्याने काही कृ षी सेवा केंद्र मालक मध्य प्रदेशातून बियाणे आणून अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करीत आहेत. या गंभीर बाबीकडे कृ षी विभागाचे साफ दुर्लक्ष आहे.
तालुक्यातील शेतकरी दरवर्षी १० मेपासून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करतात; मात्र राज्य शासनाने राशी कंपनीच्या ६५९ या वाणावर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना बियाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा नेमका फायदा घेऊन अडगाव, हिवरखेड, तेल्हारा येथील कृ षी सेवा केंद्र मालक मध्य प्रदेशातून ६५९ हे बियाणे आणून शेतकऱ्यांना एक हजार रुपये प्रतिबॅग पावती न देता राजरोसपणे विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याने नाइलाजाने जादा पैसे देऊन बियाणे खरेदी करून शेतात कपाशीची लागवड करीत आहेत. सदर बियाणे न निघाल्यास त्याला जबाबदार कोण, कृ षी सेवा केंद्रांवर सर्रासपणे विक्री होत असताना कृ षी विभाग गप्प का, एकीकडे शासन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असताना शेतकऱ्यांची लूट होत असताना कृ षी विभाग का कार्यवाही करीत नाही, असे सवाल शेतकरी विचारत आहेत.

शासनाने सध्या ६५९ या बियाण्यावर बंदी आणली असून, जे दुकानदार बियाण्याची विक्री करीत असतील, त्यांची माहिती दिल्यास सदर दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येईल.
- सागर इंगोले,
तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.

शासनाने ६५९ राशी कंपनीच्या बियाण्यावर सध्या बंदी आणली असून, शासनाने परवानगी देताच शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यात येईल. शेतकऱ्यांनी कृ षी सेवा केंद्रावरून विनापावतीचा माल खरेदी करू नये.
- विनयकुमार राठी,
संचालक, कृ षी सेवा केंद्र, हिवरखेड.

Web Title: Farmers looted agricultural service center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.