विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

By Admin | Updated: November 20, 2015 02:19 IST2015-11-20T02:19:20+5:302015-11-20T02:19:20+5:30

खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील घटना.

Farmers killed by electric shocks | विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

खामगाव: मोटरपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकरी ठार झाल्याची घटना तालुक्यातील गेरू माटरगाव शिवारात १९ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तालुक्यातील गेरू माटरगाव येथील शेतकरी ईश्‍वरसिंग करतारसिंह मछले हे १९ नोव्हेंबर रोजी शेतीपिकाला पाणी देण्यासाठी नदीवरील मोटरपंप सुरू करण्यास गेले असता त्यांना विजेचा धक्का लागून जागीच ठार झाला. विजेचा धक्का लागल्यानंतर ईश्‍वरसिंग मछले यांचा किंचाळण्याचा आवाज आल्याने बाजूच्या शेतात काम करीत असलेले त्यांचे चुलतभाऊ रमेश लक्ष्मण मछले हे त्या दिशेने गेले असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी रमेश मछले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ गणेश मानेकर करीत आहेत.

Web Title: Farmers killed by electric shocks