शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला; पेरणीबाबत संभ्रम, बियाणे बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:57 IST

अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेरावे याबाबत संभ्रम असल्याने बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. हे चित्र विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे.

ठळक मुद्देमहाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मात्र यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज बाधून नियोजन केले आहे.महाबीजच्या या बियाण्यांसह १० लाख ५० हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले. आतापर्यंतच्या प्रघातानुसार १५ मेनंतर बाजारात बियाणे खरेदीची लगबग सुरू होते; पण अद्याप शेतकरी बियाणे बाजारात फिरकला नाही.

अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेरावे याबाबत संभ्रम असल्याने बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. हे चित्र विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे.राज्यात मागच्यावर्षी १ कोटी ४९ लाख हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी ८० लाख हेक्टर म्हणजे ६० टक्के क्षेत्र सोयाबीन व कापसाचे होते. १० टक्के कापसाचे क्षेत्र वाढल्याने ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी झाली होती. सोयाबीन क्षेत्र ३८ लाखावर गेले होते; पण मागच्या वर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान झाले तर कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. मूग, उडीद पीकही हातचे गेल्याने यावर्षी कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कृषी विभाग व महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मात्र यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज बाधून नियोजन केले आहे. महाबीजने ४ लाख ३० हजार क्विंटल बियाणे बाजारात आणले आहे. तसेच महाबीजच्या या बियाण्यांसह १० लाख ५० हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले. कृषी आयुक्तालयाच्यावतीने यावर्षी ३७५ कापसाच्या हायब्रीड वाणांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाबीजने इतर वाणांसह तृणधान्य १ लाख ४ हजार २७९ क्विंटल, कडधान्य ४० हजार ४१० क्विंटल व इतर १,३४२ क्विंटल बियाणे मिळून ५ लाख १६ हजार ३२ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून,९० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध करू न देण्यात आले. खासगी कंपन्यांचे हे बियाणे बाजारात आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या प्रघातानुसार १५ मेनंतर बाजारात बियाणे खरेदीची लगबग सुरू होते; पण अद्याप शेतकरी बियाणे बाजारात फिरकला नाही. 

मान्सूनपूर्व कापसाचे क्षेत्र घटले !मागच्यावर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान केल्याने यावर्षी बीटी कापसाचे बियाने २० मेपर्यंत विक्रीवर शासनाने प्रतिबंध घातला होता. मान्सूनपर्व किंवा धूळपेरणी ही १५ ते ३० मेपर्यंत केली जाते; पण त्या काळात बियाणेच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. तसेच पाणीही उपलब्ध नसल्याचा परिणाम या पेरणीवर झाला. 

यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले असून, मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला. त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी करीत आहेत. आणखी एखादा चांगला पाऊस पडल्यास बियाणे खरेदीसाठी गर्दी होईल. शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी