पेरणी करताना शेतक-याचा हृदयविकाराने मृत्यू

By Admin | Updated: July 8, 2016 00:09 IST2016-07-08T00:09:43+5:302016-07-08T00:09:43+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

Farmers die of heart disease while sowing | पेरणी करताना शेतक-याचा हृदयविकाराने मृत्यू

पेरणी करताना शेतक-याचा हृदयविकाराने मृत्यू

वडनेर भोलजी (जि. बुलडाणा): शेतामध्ये पेरणी करीत असतानाच येथील शेतकरी वसंत श्यामजी सातव (वय ६५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी येथील शेतशिवारात घडली. वडनेर परिसरात दोन दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पेरणीची कामे सुरू आहेत. वसंत सातव हे देखील गुरुवारी आपल्या वडनेर शिवारातील शेतात स्वत: पेरणी करीत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व जागेवरच कोसळले. त्यांना उपचारार्थ मलकापूर येथील खासगी रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत शेतकर्‍याच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Farmers die of heart disease while sowing