शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता रेल्वेने पाठवता येणार फळे-भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:46 IST

यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाने नवीन उपक्रम हाती घेतला असून, शेतकरी व व्यापाºयांना भाजीपाला, फळे आता बाहेरगावी पाठवता येणार आहेत. त्यासाठी रेल्वेची रॅक उपलब्ध होणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्च मध्यरात्रीपासून देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून, परराज्यात शेतमाल पाठविणे बंद झाले आहे. शेतकºयांचे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकºयांना फळे व भाजीपाला इतर राज्यात पाठवायचा असल्यास तो आता पाठवता येणार आहे. व्यापाºयांनाही फळे, भाजीपाला पाठवता येणार आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे. शेतमाल पोहोचवण्यासाठी लागणारा खर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर फळे, फुले व इतर भाजीपाला दरवर्षी इतर राज्यात पाठविण्यात येतो. विदर्भातून संत्रा, खान्देशातून केळी, नाशिक, सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब, पपई यासह इतर फळे, भाजीपालादेखील पाठवला जातो. अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कागदी लिंबू हा इतर राज्यात पाठविण्यात येतो; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोड वाहतूक बंद असल्याने शेतकºयांचा माल तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकºयांना ही दिलासादायक बातमी कृषी विभागाने दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीrailwayरेल्वे