शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अकोट-पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार दुष्काळी मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:16 IST

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.

- संतोष येलकरअकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांतील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळी मदत देण्यात आली असून, आता या तालुक्यांव्यतिरक्त दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांतील शेतकºयांनाही पीक पैसेवारीचा निकष लावून पीक नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ७ जून रोजी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.गत २३ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी मदत वाटपासाठी शासनामार्फत गत २५ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर राज्यातील ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याचा निर्णय गत २१ फेबु्रवारी रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमध्येही दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. राज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांतील शेतकºयांना आधीच पीक नुकसान भरपाईपोटी मदत देण्यात आली असूून, त्यानंतर या तालुक्यांव्यतिरिक्त ज्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, त्या गावांतील शेतकºयांना पीक पैसेवारीचा निकष लावून पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळी मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जून रोजी जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदत मिळणार आहे.दोन तालुक्यांत अशी आहेत दुष्काळग्रस्त गावे!तालुका           गावेअकोट            १६७पातूर               ९४....................................एकूण            २६१शासन निर्णयाची प्रतीक्षा!राज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांतील शेतकºयांना आधीच पीक नुकसान भरपाईपोटी मदत देण्यात आली असून, त्यानंतर या तालुक्यांव्यतिरिक्त दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांमधील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; मात्र यासंदर्भात आता शासन निर्णय जिल्हा प्रशासनाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा करण्यात येत आहे.पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी

१३७ कोटींच्या मदतीचे वाटप!गत २३ आॅक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत गत फेबु्रवारीमध्ये प्राप्त झालेला १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला. संबंधित बँकांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळakotअकोटPaturपातूर