अकोट तालुक्यात विज पडुन शेतमजुर ठार , एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 15:56 IST2019-10-30T15:54:10+5:302019-10-30T15:56:35+5:30
लाडेगाव शेतशिवारात गवत निदंत असताना अचानक विज कोसळली.

अकोट तालुक्यात विज पडुन शेतमजुर ठार , एक जखमी
ठळक मुद्देही घटना ३० आँक्टोबर रोजी दुपारी३.३० वाजता घडली. बेलूरा येथील शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा मृत्यु झाला. अनील पंचाग हा शेतमजुर जखमी झाला असल्याची माहीती आहे.
अकोटःअकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात अंगावर विज पडल्याने शेतमजूराचा जागेवर मृत्यू झाला. तर दुसरा शेतमजुर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ३० आँक्टोबर रोजी दुपारी३.३० वाजता घडली.
अकोट तालुक्यातील पाऊस व विजेचा गडगडाट सुरु आहे. लाडेगाव शेतशिवारात गवत निदंत असतांना अचानक विज कोसळली. त्यामध्ये
बेलूरा येथील शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा मृत्यु झाला. तर अनील पंचाग हा शेतमजुर जखमी झाला असल्याची माहीती आहे. घटनास्थळावर त्वरित गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बनवली योगीराज रुग्णवाहिकेचे चालक संजय शेळके यांनी जखमी अनिल पंचांग यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता पोहोचविले आहे