तुलंगा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 19:44 IST2017-07-06T19:44:21+5:302017-07-06T19:44:21+5:30
दिग्रस बु. : चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत तुलंगा बु. येथील रामदास संपत हिवराळे (६५) यांनी ६ जुलै रोजी सकाळी शेतामध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुलंगा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस बु. : चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या तुलंगा बु. येथील रामदास संपत हिवराळे (६५) यांनी ६ जुलै रोजी सकाळी तुलंगा ते वाडेगाव रस्त्यालगत असलेल्या शेतामध्ये असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मृतक रामदास हिवराळे यांच्याकडे दोन एकर जमीन असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्या जमिनीमधून ते दरवर्षी पीक घेत असत. सततची नापिकी व दुबार पेरणीच्या संकटाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. गुरुवारी ते नित्यनियमानुसार एक गाय, एका वासराला चारण्यासाठी घेऊन गेले होते. गुरे बांधून त्यांनी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान दोरीने गळफास घेतला. याबाबत चान्नी पोलीस स्टेशनला पोलीस पाटील अशोक तायडे यांनी कळविले. त्यानंतर तायडे यांनी माजी सरपंच देवराव हातोले, दादाराव हातोले, पटवारी पी. बी. खंडारे, कोतवाल गजानन वैराळे यांच्यासह घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. मृतक शेतकरी रामदास हिवराळे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा आप्त परिवार आहे.