शेतकरी आत्महत्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे स्वीकारले पालकत्व!
By Admin | Updated: August 31, 2015 01:47 IST2015-08-31T01:47:15+5:302015-08-31T01:47:15+5:30
समाजातील सहृदयी मान्यवरांचा पुढाकार

शेतकरी आत्महत्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे स्वीकारले पालकत्व!
अकोला : दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. नैराश्यातून जीवनयात्रा मध्येच संपविणार्या शेतकर्यांची कुटुंब मात्र उघड्यावर पडली आहेत. अशा कुटुंबातील मुला-बाळांच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण होतो. या प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील सहृदयी व्यक्ती पुढे येतात तेव्हा निराशेने ग्रासलेल्या कुटुंबांमध्ये जीवन जगण्याचा एक आशोचा किरण दिसू लागतो. अशाच ब्र१ी येथील शेतकरी आत्महत्या कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील सहृदयी मान्यवरांनी स्वीकारले आहे. रविवारी ब्र१ी खुर्द येथील अंगणवाडीत पार पडलेल्या कार्यक्रमात पालकत्व स्वीकारण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संयोजक डॉ. पृथ्वीसिंह राजपूत होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. एच. किर्दक, प्राचार्य डॉ. अजय चर्जन, व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा. ज्ञानेश्वर ढेरे, जि. प. सदस्य रवींद्र गोपकर, सरपंच पुष्पा उमाळे, डॉ. चिंतामन कांबळे, भूजल तज्ज्ञ पालनदास घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आणखी दत्तक घेतले जाईल, अशी ग्वाही डॉ. राजपूत यांनी दिली. कार्यक्रमात ग्रामपंचायत ब्र१ीच्यावतीने डॉ. पी. आर. राजपूत, डॉ. बी. एच. किर्दक, रवींद्र गोपकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. चिंतामन कांबळे, विजया वानखडे, रामेश्वर धंदर, ग्रामसेवक भारत भोरखडे, सरपंच पुष्पा उमाळे, महिला व बालकल्याण अधिकारी मायावती खरात, पालनदास घोडेस्वार यांचा अंगणवाडी केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समाधान इंगळे यांनी, तर संचालन प्रमोद इंगळे यांनी केले. आभार वर्षा इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक उमेश सराळे, सिंधू इंगळे, मंगेश घोडेस्वार, प्रदीप इंगळे, अतुल दहातोंडे, इनायत खान, वंदना सळेदार, पद्मा वानखडे, वंदना समदुरे, प्रेमिला चौठाळे, प्रतिभा वर्हेकर, उषा धोटे, अमर इंगळे, निरंजन वर्घट, सुशीला शिंदे आदींनी परिश्रम घेतले.