अकोला जिलत शेतकरी पुत्राची आत्महत्या
By Admin | Updated: September 30, 2015 00:44 IST2015-09-30T00:44:01+5:302015-09-30T00:44:01+5:30
कर्जबाजारीपणामुळे महान येथील शेतकरीपुत्राने घेतला गळफास.

अकोला जिलत शेतकरी पुत्राची आत्महत्या
महान (जिल्हा अकोला): येथील एका शेतकरी पुत्राने २९ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय लक्ष्मण उमाळे (वय २६) हे जीवन संपविलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. महिला शेतकरी पार्वताबाई लक्ष्मण उमाळे यांच्या मालकीचे दोन एकर शेत हलदोली (कोथळी) येथे आहे. पती लक्ष्मण व दोन मुले हे शेतमजुरी करतात. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले; मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे कुटुंब हवालदिल झाले. २९ सप्टेंबर रोजी कुटुंबातील सदस्य शेतात कामाला गेले होते. त्यांचा सर्वात लहान मुलगा विजय लक्ष्मण उमाळे (वय २६) हा शेतात गेला नाही. दुपारी त्याने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. पार्वताबाई शेतातून घरी परतल्यानंतर ही घटना उजेडात आली. मृतक विजय यास पत्नी व एक वर्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी औषधोपचारासाठी माहेरी गेली. घटनेची माहिती त्याचा मोठा भाऊ संतोष उमाळेने पोलिसांना दिली. महान पोलीस चौकीचे उपनिरीक्षक डी.एन. फड यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला.