शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:32 IST

पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.

पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. या हल्ल्यात शेतक री गंभीर जखमी झाला. शेख मोबीन शेख इमाम (४०) रा. मुजावरपुरा पातूर असे जखमी शेतकºयाचे नाव आहे. मजूर महिलांनी आरडाओरड केल्याने शेख मोबीन यांचे प्राण वाचले.पातुरातील मुजावरपुरा येथील शेतकरी शेख मोबीन शेख इमाम (४०) यांचे पातूर-बाळापूर रोडवरील सिंगर नाल्याजवळ शेत आहे. या शेतामध्ये ते सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान कपाशीला पाणी देत होते, तसेच ३ ते ४ महिला शेतात काम करीत होत्या. यावेळी अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर धाव घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला मजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट तेथून पळून गेला. यावेळी बिबट्याचा पंजा लागल्याने शेख मोबीन हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पातूर प्राथमिक आराग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर वन विभागाच्या वाहनाने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा हैदोस सुरू आहे. शेतकºयांवर हल्ला केल्याने मजूरही काम करण्यासाठी शेतात जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांसह शेतमजुरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरwildlifeवन्यजीवFarmerशेतकरी