शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

पीक विम्याचे मिळालेले ५ रुपये, शेतकऱ्याने केले परत ! प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची थट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:32 IST

Akola : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अस्मानी संकटात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली. मात्र, या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांनी ही रक्कम सरकारला बुधवारी परत केली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर चक्क पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा झाली.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही केवळ आर्थिक थट्टा असल्याचा आरोप करत, नाराज शेतकऱ्यांनी ही तुटपुंजी मदत बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला परत केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीक विम्याची रक्कम धनादेशाद्वारे परत केली आहे. यावेळी आदित्य मुरकुटे, उमेश कराड, अविनाश नागरे, रोहित वखारे, नंदकिशोर मोडक, सुधाकर दामोदर, देवीदास गावंडे, नीलेश वाकोडे, मनोज पाचबोले, रघुनाथ कोल्हे, केशव केंद्रे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली तुटपुंजी रक्कम

  • कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा आणि रेल या गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई म्हणून ५ ते २७ रुपये जमा झालेत.
  • अरुण राऊत या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ 3 रुपये ८ पैसे, संदीप घुगे यांना ५ रुपये, गणपत सांगळे यांना १३ रुपये, विजय केंद्रे यांना १४ रुपये ७ पैसे, केशव केंद्रे यांना १६ रुपये १५ पैसे, आदित्य मुरकुटे यांना २१ रुपये ८५ पैसे आणि उमेश कराड यांच्या खात्यावर २७ रुपये ५ पैसे जमा झालेत.
  • तुटपुंजी रक्कम मिळालेले हे शेतकरी प्रातिनिधिक आहेत. याव्यतिरिक्त आणखीही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.

 

"शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची जी रक्कम जमा झाली आहे, त्या पैशांत तर एक पाव साखरही विकत घेता येत नाही. अशा रकमेच्या स्वरूपात मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे ही रक्कम परत केली आहे."- कपिल ढोके, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer returns paltry crop insurance: Farmers mocked in scheme.

Web Summary : Akola farmers returned meager crop insurance payouts, some as low as ₹5, calling it an insult. Led by Congress, they protested the inadequate compensation for crop loss due to natural disasters under the PM crop insurance scheme.
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीfarmingशेतीAkolaअकोला