शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पीएम-किसान मानधन योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:13 IST

‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आपले सरकार सेवा केंद्रांवर (सीएससी) जिल्ह्यातील शेतकºयांची नोंदणी सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला; मात्र ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ७0८ शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे.प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ आॅगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकºयांनी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर संबंधित शेतकºयांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार प्रतिमाह कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार असून, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानुषंगाने ‘पीएम-किसान’ मानधन योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत गत १६ आॅगस्टपासून जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणी सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ७0८ शेतकºयांनी नोंदणी केली. नाव नोंदणीत शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद बघता, ‘पीएम-किसान’ मानधन योजनेंतर्गत नाव नोंदणीकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याची बाब समोर येत आहे.

विमा हप्ता रकमेचा अडसर!प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत नाव नोंदणीनंतर लाभार्थी शेतकºयांनी प्रतिमाह विमा हप्त्याची रक्कम संंबंधित विमा कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. विमा हप्त्याची रक्कम भरल्यानंतर आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत नाव नोंदणीसाठी शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, त्यासाठी विमा हप्त्यापोटी भराव्या लागणाºया रकमेचा अडसर ठरत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी